श्री रामनाथ विद्यालयात 1997-98 च्या बॅचचा विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न..

 श्री रामनाथ विद्यालयात 1997-98 च्या बॅचचा विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न..



औसा प्रतिनिधी 


आलमला श्री रामनाथ मा. उच्च विद्यालय आलमला ता. औसा जि. लातूर येथे दि.24/10/25 वार शुक्रवार रोजी  1998च्या इ. 10 बॅचचा विद्यार्थ्यां चा स्नेह मेळावा अर्थात भेटी लागे जीवा, गेट-टुगेदर कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्सवात संपन्न झाला.  या कार्यक्रमात 105  माजी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली होती. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे, प्रमुख अतिथी म्हणून  माजी प्राचार्य सौ अनिता पाटील,  श्री मुळे एस के, श्री गायकवाड  एम व्ही,  प्राचार्य श्री पी सी पाटील, क्रीडा शिक्षक रंगनाथ अंबुलगे हे कार्यक्रमास  उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा फेटा शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वांना मार्गदर्शन सचिव प्रभाकर कापसे यांनी  करतेवेळी आपण आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना समाजकार्या मध्येही काहीतरी समाजाची देणे लागतो या उदात्त भावनेने आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या त्या क्षेत्रामध्ये समाज उपयोगी काम करत राहावे असे आव्हान केले . तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री मुळे एस के, सौ पाटील ए आर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जुन्या काळातील विविध आठवणींना उजाळा  देऊन आपण यापुढेही आपल्या जीवनात आपल्या गुरुना शाळा ,आई-वडील ,यांना विसरू नये असे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच  प्राचार्य श्री पी सी पाटील व गायकवाड एम व्ही यांनीही सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि परत एकदा आपण 27 वर्षानंतर एकत्र भेटलो याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा परिचय करून घेऊन ते करत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी रामनाथ विद्यालयाची ज्ञानाची ज्योत कायम प्रज्वलित राहावी म्हणून चार फूट उंचीची पितळेची एक उंच मोठा नंदादीप  शाळेला भेटवस्तू म्हणून दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अलमलकर विठ्ठल यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप आडे सर यांनी केले व आभार इरशाद पांडे यांनी मांडले  काही माझी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना गहिवरले आणि भावुक होऊन आपण कसे घडलो हे आपल्या शब्दातून मांडले हा कार्यक्रम स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री विजय अंबुलगे, रुपेश आंबुलगे, निलेश बिराजदार,कमलेश निलंगेकर, फयाज फाजल, अश्विन चरकपल्ले विशाल हुरदळे ,शिवराम पाटील सोमनाथ अंबुलगे, शिवशंकर आलमलकर ,विनोद ठाकूर तसेच सरस्वती गुरव, वैशाली निलंगेकर, सविता कासार, कांचन वाघमारे उषा अंबुलगे स्नेहलता निलंगेकर  आशा सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले विद्यालयाचा सर्व कर्मचारी स्टाफ  व गेट-टुगेदर बॅचच्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या