बोरफळच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद -----पोलीस निरीक्षक डमाळे

 बोरफळच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद 

-----पोलीस निरीक्षक डमाळे


औसा : रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक धार्मिक सलोखा ठेवून  बोरफळ येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाने  उत्सवा दरम्यान आयोजित केलेले सामाजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याची प्रांजळ भावना  औसा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री डमाळे यांनी व्यक्त केली.

 मंडळातील तरुणांनी औसा पोलीस स्टेशनला येऊन त्यांचा सत्कार  केला त्यावेळी श्री डमाळे बोलत होते.गणेश उत्सव हा महाराष्ट्रात साजरा होणारा अत्यंत मोठा सण असून सर्व धर्माची माणसं आपल्या गणरायाला पुजतात आणि सर्वाना गणेशाप्रति विलक्षण आकर्षण असते. घरोघरी गणरायाचे आगमन होत असते आणि अबालवृद्धापासून सर्वजण या आनंदात तब्बल अकरा दिवस तल्लीन होतात.गणेश उत्सव हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून त्यातून गावगाड्यातील सर्वांना जोडणारा एक ऋणानुबंधाचा समान धागा आहे असेही मत श्री डमाळे यांनी व्यक्त केले.

 कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलीस प्रशासनाने खूप चांगली भूमिका घेऊन सामाजिक एकता आणि सर्वधर्मसमभाव याची जोपासना केल्याने आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी पोलीस निरीक्षक श्री डमाळे यांचा विघ्नहर्ता गणेश मंडळाने सत्कार केला. देशात शेतकरी शेतमजूरानी एकत्र येत गणेश उत्सवात आपल्या देखाव्यातून आपल्या प्रश्नाला लोकात दाखवून शेती आणि माती हीच आपली जननी असल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, राजेंद्र आबा मोरे यांच्या मार्गदर्शनात हे गणेश मंडळ कार्यरत असल्याने निश्चितच आदर्श असेल असं ही मत त्यांनी मांडले आहे.पोलीस प्रशासन नेहमीच चांगल्या रूढी परंपरेला प्रोत्साहन देते आणि  वाईट चालीरीतीच्या प्रवृत्तीला  तिलांजनी देण्यासाठी कटिबद्ध आहे. या मंडळाने आयोजित केलेले सामाजिक उपक्रम इतरांनी सुद्धा अंगीकारून आदर्श घ्यावा अशी त्यांनी कौतुकाची थाप मंडळातील तरुणांच्या पाठीवर मारली.

 यावेळी विघ्नहर्ता गणेश मंडळाचे अध्यक्ष बालाजी राजेंद्र यादव,उपाध्यक्ष प्रथमेश सुगावे,सचिव यशोदीप पाटील व महादेव यादव, सदस्य विकास राऊत,सावन सूर्यवंशी,ओमकार श्रीहरी यादव, विशाल आगवणे,संकेत सुरवसे,चैतन्य पांडुरंग यादव, अजित बायस, निखिल ढवळे (भादा), हणमंत सामदडे (तपशेचिंचोली),प्रतीक सुगावे,साहिल शेख, DJ गणेश सुगावे, शुभम शिंदे,सागर सूर्यवंशी,प्रेम सुरवसे,अथर्व कंटेकर,जनक यादव, चिकू सुरवसे, नामदेव सुरवसे, इत्यादी तरुण मंडळी उपस्थित होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या