औसा येथे स्मार्ट मिटर विरोधात एमआयएम चे निवेदन..
औसा प्रतिनिधी
औसा, दि. 08 सप्टेंबर 2025:
औसा शहर आणि तालुक्यात सध्या सुरू असलेल्या स्मार्ट विद्युत मिटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात एमआयएम पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे
एमआयएम पक्षाच्या वतीने मा. उपअभियंता, महावितरण औसा यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, नागरिकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मिटर बसवले जात असून, यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे.
या स्मार्ट मिटरमुळे अचानक वीजपुरवठा बंद होतो.ग्राहकांचे हक्क बाधित होतात.
बिले अनैतिकपणे जास्त येतात.
सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढतो
पक्षाने म्हटले की, आधीचे मिटर योग्य प्रकारे कार्यरत असताना नवीन मिटर बसवण्याची आवश्यकता नाही. नागरिकांच्या परवडीच्या बाहेर असलेले हे स्मार्ट मिटर त्वरित थांबवावेत, अन्यथा एमआयएमकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनप्रसंगी अॅड. गफुरउल्ला हाशमी (एमआयएम माजी तालुकाध्यक्ष औसा), सय्यद कलीम ( माजी शहराध्यक्ष), सय्यद जमीरूद्दीन ( माजी शहर सचिव), सय्यद मुजीब, पठाण गफुर, अस्लम नवाब, शेख अतीक, सादिक पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या