औसा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य पुरस्कार सोहळा आणि रक्तदान शिबीराचे आयोजन!
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
औसा (जि. लातूर) –
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त
औसा ब्लड डोनेर्स टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि औसा शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने दिनांक ५ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी एक भव्य "ईद-ए-मिलादुन्नबी" निमित्त कार्यक्रम हसीना उर्दू शाळा,खडकपुरा औसा येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमामध्ये सामाजिक, पत्रकारिता, उद्योग, आरोग्य, विधी, आणि कला क्षेत्रातील संघर्ष करणाऱ्या योध्यांचा "माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले पुरस्कार"फरीद शेख लातूर यांना समाज रत्न पुरस्कार, सय्यद खुंदमीर मुल्ला यांना सोशल मिडिया पुरस्कार, पत्रकार बशीर शेख लातूर यांना पत्रकार रत्न पुरस्कार,तौसिफ शेख यांना कला रत्न पुरस्कार, डॉ.जूनेद अरब यांना आरोग्य रत्न पुरस्कार, अँड.शाहनवाज पटेल यांना कायदा रत्न पुरस्कार, सय्यद जबीऊल्ला कादरी यांना शिक्षक रत्न पुरस्कार,महेदी मनियारी किरीडा रत्न पुरस्कार,अजहरऊल्ला हाश्मी युवा उद्योग रत्न पुरस्कार, सुलेमान अफसर शेख यांना युवा नेता पुरस्कार, सय्यद मुस्तफा वकील यांना युवा प्राध्यापक पुरस्कार, व सामाजिक क्षेत्रात काम करणारे योध्दा त्यामध्ये उमेश कांबळे ,जाफर शेख,वैभव दत्तागिरे,आवेज शेख शादाब हन्नूरे,आणि लातूर ब्लड डोनेर टिमला यांना
मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मान पत्र देण्यात आले.या
कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणजे रक्तदान शिबीर, या शिबिरामध्ये 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.या शिबिरात रक्तदान केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास
कॉग्रेस पक्षाचे सरचिटणीस
अमर भैय्या खानापुरे,
शहराध्यक्ष अजहर हाश्मी, कार्याध्यक्ष खुंदमीर मुल्ला, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, शहरप्रमुख सुरेशदादा भुरे,
राष्ट्रवादी अजितदादा पवार गटचे विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख, लातूर चे सामाजिक कार्यकर्ते अँड.लालासाब शेख,एम आय एम औसा माजी युवा शहराध्यक्ष इम्रान बागवान, अल्पसंख्याक भाजपे अकरमखांन पठाण,,उमर पंजेशा, अफसर शेख युवा मंचचे शहराध्यक्ष सय्यद मुस्तफा वकील,नियामत लोहारे,हाजीभाई शेख,खाजाभाई शेख, सय्यद जबी कादरी, अँड शाहनवाज पटेल, पत्रकार एस ए काझी, मुख्तार मणियार आणि इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अल्ताफ करपुडे,गौस चौधरी, खुंदमीर आलुरे,कामरान हन्नुरे, रिजवान शेख,हकीम आलुरे,अशफाक सय्यद,आदिनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन अरबाज पठाण,शादाब हन्नूरे,नियामत अलुरे, अल्ताफ सय्यद यांनी केले होते.



0 टिप्पण्या