काशी विश्वेश्वर मंदिरात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप.
औसा प्रतिनिधी
श्री जगद्गुरु विश्वआराध्य जनकल्याण प्रतिष्ठान वाराणसी संचलित..
काशी विश्वेश्वर मंदिर व जगद्गुरु विद्यार्थी वस्तीगृह विशाल नगर लातूर येथे काल दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी श्री श.ब्र.१००८ शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा यांच्या हस्ते समाजातील अत्यंत गरीब, निराधार,होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी प्रति विद्यार्थी १६ हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप.प्रत्येक वर्षी या प्रतिष्ठानच्या वतीने देशभरातील ७०० च्या वर विद्यार्थ्यांना प्रत्येकी १६ हजार रुपये मदत दिली जाते.ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. या कार्यक्रमाला श्री.गुरुच्या सानिध्यात मान्यवरासह उपस्थित राहण्याचा योग आला.
0 टिप्पण्या