तहसील कार्यालयात मुक्तिसंग्रामाचे ध्वजारोहण आणि सेवा पंधरवड्याचा शुभारंभ..
औसा प्रतिनिधी
दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे निमित्ताने तहसीलदार घनश्याम रसोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली यावेळी आमदार अभिमन्यू पवार, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, नायब तहसीलदार सुरेश पाटील, मुस्तफा कोंदे, प्रियंका बोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक रेवनाथ ढमाले, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोहन जाधव यांच्यासह महसूल विभागाचे अनेक मंडळाधिकारी तलाठी महसूल सहाय्यक व तहसील कार्यालयातील कर्मचारी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. 17 सप्टेंबर हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असा दुहेरी संगम साधून औसा तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये तीन टप्प्यात सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सेवा पंधरवाडा कालावधीमध्ये नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी घेऊन किंवा कोडच्या सहाय्याने सात दिवसात प्रकरणे निकाली काढून तक्रारीचा निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार औसा यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी पंचसूत्री आणि सर्वांसाठी घरे हा उपक्रम तसेच शेत रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
0 टिप्पण्या