मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औसा येथे स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन
औसा प्रतिनिधी
17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून संपूर्ण मराठवाड्यात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो 17 सप्टेंबर 1948 साली जुलमी निजामाच्या तावडीतून मराठवाड्यातील आठ जिल्हे मुक्त करण्यासाठी मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. यामध्ये मराठवाड्यातील आद्य स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे स्मारक औसा येथील खादी कार्यालयासमोर उभारण्यात आल्या असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश आप्पा ठेसे, खादी कार्यालयाचे व्यवस्थापक रघुनाथ पोद्दार, पत्रकार विजय बोरफळे, राम कांबळे, रमेश दूरकर, मुख्तार मणियार, सदाशिव जोगदंड, सिद्रामप्पा कुरले, अजित मुसांडे, शिवरुद्र मुरगे ,लिंबाजी देवकते, सचिन जोजन, संभाजी शिंदे,वैभव कुलकर्णी यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी औसा नगर परिषदेच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 अॉक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करुन स्वच्छ असा सुंदर औसा निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
0 टिप्पण्या