विघ्नहर्ता च्या आगमनानंतर गणेश भक्तांनी जल्लोषात केली श्रींची स्थापना..

 विघ्नहर्ता च्या आगमनानंतर गणेश भक्तांनी जल्लोषात केली श्रींची स्थापना..



औसा प्रतिनिधी 


श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पावसाने सुरुवात केली रात्रभर पाऊस सुरू होता सकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्याने वरून राजा आणि विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचे गणेश भक्तांनी जल्लोषात स्वागत केले औसा शहरासह ग्रामीण भागातील नोंदणीकृत गणेश मंडळांनी श्री गणेशाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढत विधिवत पूजा करून स्थापना केली सायंकाळी सात वाजेपर्यंत औसा शहरात 12 आणि ग्रामीण भागातील 22 गणेश मंडळांनी रितसर परवानगी घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी दिवसभर औसा शहरात श्री गणेशांची मूर्ती घेऊन मिरवणूक काढीत हलगी, ताशा, बँड आणि डॉल्बी इत्यादीवाद्यासह गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करीत श्रींची स्थापना केली. औसा शहरात मानाचा श्री वीरशैव गणेश मंडळ, नरसिंह गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ, रॉक गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी गणेश मंडळ, अन्नपूर्णा गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, आजोबा गणेश मंडळ, आझाद गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्क्रीनच्या मूर्तीची विधीवत स्थापना केली. गणेश मंडळाची परवानगी ऑनलाईन प्रणालीद्वारे असल्यामुळे नेमक्या किती मंडळाची नोंदणी झाली हे सायंकाळी सात वाजेपर्यंत कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या