सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त औसा येथे पोलिसांचे पथसंचलन

 सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त औसा येथे पोलिसांचे पथसंचलन 


औसा प्रतिनिधी .


बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होत असून श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्री मनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा शहरातून पोलिसांचे पतसंचलन सायंकाळी सात वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला असून गणेश भक्तांच्या आनंदाचा हा सार्वजनिक उत्सव सामाजिक सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये शांततेत सर्व धर्मीय बांधवांनी सहभागी होऊन साजरा करावा असे आवाहन औसा पोलीस प्रशासनाने गणेश भक्तांना केले आहे. गणेशोत्सवाचा काळामध्ये श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना केल्यापासून विसर्जनापर्यंत नोंदणीकृत गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी तसेच गणेश उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गणेश भक्तांनी वॉटरप्रूफ मंडप उभारून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी असे सूचित केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या