औशात शेतकरी, व्यापारी, वाहन चालक व कुरेशी समाजाचा मुकमोर्चा ..
औसा प्रतिनिधी
शेतकरी, व्यापारी, वाहन चालक, कुरेशी समाज, शेतमजूर व अल्पसंख्यांक समाजावर वाढत चाललेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात औसा शहरात शांततामय पण ठाम अशा मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य मोर्चाचे आयोजन जमिअतूल कूरेश कमिटी औसा यांच्यावतीने करण्यात आले असून, 25 ऑगस्ट 2025 रोजी सोमवार सकाळी 10 वाजता हा मोर्चा किल्ला मैदान येथून सुरु होऊन तहसील कार्यालयावर धडकणार आहे.या मूक मोर्चात शेतकरी, व्यापारी, वाहन चालक, वंचित बहुजन आघाडी,आणि विविध पक्ष,व संघटना सहभागी होणार आहेत अशी माहिती औसा येथिल शासकीय विश्रामगृह येथे क्रांतीकारी शेतकरी संघटना, व्यापारी, वाहन चालक, कुरेशी समाजाचे अध्यक्ष,व सामाजिक कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषदेत 25 रोजी सोमवारी किल्ला मैदान येथून ते तहसील कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती 24 अॉगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, हा मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडणार असून प्रशासनाच्या निदर्शनास विविध मागण्या व प्रश्न मांडण्यात येणार आहेत. सामाजिक न्यायासाठी व अधिकारांसाठी लढा देणाऱ्या या मोर्चात शेतकरी , व्यापारी, वाहन चालक, कुरेशी समाजाचे सर्व बांधव सहभागी व्हावे, असे आवाहन जमिअतूल कूरेश कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजीव कसबे, कुरेशी समाजाचे अध्यक्ष नसीर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला, शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे, मुनाफ कुरेशी, इलियास चौधरी व शेतकरी, व्यापारी, कुरेशी बांधव ,आदिंची पत्रकार परिषदेस उपस्थिती होती.
0 टिप्पण्या