येणाऱ्या पांच वर्षांमध्ये औसा राज्यात एक नंबर राहील: आ अभिमन्यू पवार

 येणाऱ्या पांच वर्षांमध्ये औसा राज्यात एक नंबर राहील: आ अभिमन्यू पवार



शहरातील धनगर गल्ली / पाटील गल्ली येथे १२० कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ


औसा: औसा शहरातील अत्यंत महत्त्वाचा पाणीप्रश्न मिटला आहे. याचसोबत आरोग्याच्या दृष्टीने १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून २ एमव्हीए अतिरिक्त बीज शहरासाठी उपलब्ध करून दिल्याने वीजेचा प्रश्नही मार्गी लागला असताना औसा शहराच्या विकासासाठी या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत औसा शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. येणाऱ्या काळातही शहराच्या विकासात भर घालण्यासाठी विकास निधी उपलब्ध केला जाणार आहे. एकंदरीत पुढच्या काळात


शानदार औसा, पाणीदार औसा या संकल्पनेतून विकासकामे पूर्ण केली जातील अशी ग्वाही आमदार निधीतून यांनी दिली आहे.


औसा शहरातील प्रभाग क्रमांक ७ धनगर गल्ली/पाटील गल्ली येथे १ कोटी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर


झाला या कामाचा भव्य शुभारंभ (दि. १४) ऑगस्ट रोजी संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण उटगे, बाजार समितीचे उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, नगरसेवक गोपाळ धानुरे, व्यंकटेश कोद्रे, अॅड अरविंद कुलकर्णी, औसा


शहर मंडळ अध्यक्ष प्रा शिव मुरगे, समीर डेंग, बाळासाहेब सोनवळकर, जगदीश परदेशी, कल्पना डांगे, आदिनाथ धानुरे आदीसह विविध समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी आ अभिमन्यू पवार बोलत होते की देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने औसा शहरातील


पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावता आला. निम्न तेरणा धरणातून औसा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ४५ कोटीची तरतूद करून औसा शहर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली ज्या योजनेअंतर्गत शहराला आज पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात भव्य १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून यापुढे आरोग्याच्या दृष्टीने सर्व सेवासुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील औसा नगरपालिका क वर्ग ची आहे. या शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने ७ कोटी ५० लक्ष रुपायाचे सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. शहरातील


स्वच्छता व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे निधी उपलब्ध करून देत असताना नागरिकांनीही नगरपालिकेचा कर भरणे आवश्यक आहे. जेणेकरून विकास कामांना गती येईल. शहरात बहुतांश भागात पक्के रस्ते तयार झाले आहेत. ज्या भागात झाले नाहीत आशा भागात ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील यापुढे शहरात केवळ सिमेंट काँक्रीटचेच रस्ते तयार केले जाणार आहेत. असे सांगून कामामध्ये कसल्याही प्रकारचे दर्जेदार कामे केली जातील व आपला औसा शानदार,  पाणीदार करायचं,औसा सुरक्षित करायचं आहे,औसा स्वच्छ ठेवायचं आहे,आणि तुम्ही जर मला सहकार्य केलो तर येणाऱ्या पांच वर्षांमध्ये औसा राज्यात एक नंबर राहील अशी ग्वाही यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या