शिवसेना महिला आघाडीचे जयश्रीताई उटगे यांच्याकडून श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण..

 शिवसेना महिला आघाडीचे जयश्रीताई उटगे यांच्याकडून श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण..








औसा प्रतिनिधी -

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


यावेळी बोलताना जयश्रीताई उटगे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.


कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अलका भेंडे, शक्ती बुद्ध वाघमारे, निलाबाई माशाळकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.


हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास मदत करणारा ठरला असून उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या