बोरगांवचे सुपुत्र प्रा.आर्किटेक्ट विजयकुमार सुतार यांना ‘उत्कृष्ट प्राध्यापक सन्मान – 2024-25’
औसा:बोरगाव(न) येथील सुपुत्र व दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलित दयानंद आर्किटेक्चर महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा.आर्किटेक्ट विजयकुमार राजभाऊ सुतार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दयानंद शिक्षण संस्थेच्यावतीने ‘उत्कृष्ट प्राध्यापक सन्मान – 2024-25’ हा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी व सचिव रमेश बियानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा. आर्किटेक्ट सुतार यांनी इ.स. 2015 मध्ये बी. आर्किटेक्चर पदवी संपादन केली. 2016 पासून ते दयानंद आर्किटेक्चर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून बांधकाम तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य व शहरी विकास नियंत्रण नियमावली या विषयांत विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन शैलीने विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचा संवाद आणि वास्तुशास्त्रातील नवीन दृष्टिकोनामुळे ते विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
या प्रसंगी प्रा. आर्किटेक्ट विजयकुमार सुतार म्हणाले, “माझे वडील राजभाऊ सुतार व आई श्रीमती राहिबाई सुतार यांचे आशीर्वाद विद्यार्थ्यांचे सहकार्य, सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांचा पाठिंबा आणि दयानंद शिक्षण संस्थेचे प्रोत्साहन यामुळेच मला हा सन्मान प्राप्त झाला आहे. मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.”
या सन्मानानंतर यांचे विद्यार्थी व सध्या पंचायत समिती औसा येथे कार्यरत असलेले दबंग अभियंता रविशंकर भावले यांनी ही या मिळालेल्या पुरस्कार आणि सन्मानाबद्दल प्रा सुतार यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत कौतुक केले .
या सन्मानामुळे लातूर जिल्ह्यासह मूळ गावी बोरगाव न.येथे ही अभिनंदन केले जात आहे. सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी व कुटुंबीयांनी प्रा. सुतार यांच्या यशाबद्दल आणि मिळालेल्या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या