लातूरच्या रेल्वे मागण्यांसाठी दिल्ली दरबारात ठाम आवाज!
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर निवेदन सादर; लातूर-मुंबई वंदे भारतची मागणी अग्रस्थानी.
नवी दिल्ली | प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील दीर्घकालीन रेल्वे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांची दिल्लीतील कार्यालयात भेट घेण्यात आली. या भेटीत लातूर जिल्ह्यातील रेल्वे सुविधा वाढवण्यासाठी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश होता:
लातूर–मुंबई वंदे भारत सेवा सुरु करणे,
पुणे–सिकंदराबाद वंदे भारत (लातूर–बीडर मार्गे)
कुर्डुवाडी–लातूर रोड दुहेरी मार्गाचे त्वरीत काम सुरू करणे,
हडपसर-काझीपेट एक्स्प्रेसला दररोज चालवणे व लातूरसाठी योग्य वेळ निश्चित करणे, हरंगुळ–पुणे विशेष गाडी लातूरपर्यंत वाढवणे व नियमित करणे, 22107/08 व 22143/44 या एक्स्प्रेस गाड्यांना नवीन LHB डबे देणे,
अमरावती–पुणे एक्स्प्रेस दररोज सुरू करणे,
लातूरमध्ये सुरू असलेल्या पीटलाईनच्या कामाला गती देणे,
लातूर–पुणे इंटरसिटी सकाळी सुरु करणे, आरक्षण केंद्रात सुविधा वाढवणे
वरिष्ठ नागरिक व पत्रकारांना पूर्वीप्रमाणे सूट सुरु करणे आणि ती ऑनलाइन बुकिंगसाठी लागू करणे.
या बैठकीत खा. शिवाजी काळगे, खा. डॉ. कल्याणजी काळे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अॅड. उज्वल निकम, व खा. बळवंत वानखेडे हेही उपस्थित होते.
बैठकीदरम्यान लातूर व मराठवाडा परिसरातील नागरीकांच्या विविध रेल्वे मागण्या व अपेक्षांवर चर्चा झाली. या निवेदनाद्वारे लातूरसारख्या उभरत्या जिल्ह्याच्या दळणवळण व विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळाव्यात, असा ठाम आग्रह धरण्यात आला.
0 टिप्पण्या