महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अमर खानापुरे यांची फेरनिवड
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नुकतेच हर्षवर्धनजी सपकाळ यांची निवड झाली होती. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला व त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस संघटन हे सक्षम व बळकट करण्यासंदर्भामध्ये नवी टीम काल जाहीर केली. यामध्ये त्यांनी अमर खानापुरे यांना पुन्हा नव्याने सरचिटणीसपदी (महासचिव) निवड केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये त्यांची ही निवड सलग चौथ्या वेळेस होत आहे. तत्कालीन प्रांत अध्यक्ष अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्या कमिटीमध्ये त्यांनी सचिव म्हणून काम केले होते. तर नाना पटोले यांनी त्यांना महासचिव (जनरल सेक्रेटरी) पदी नियुक्ती केले होते. आता पुन्हा नव्याने त्यांची सरचिटणीस पदी फेरनिवड झाली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय अमित देशमुख साहेब यांनी त्यांची शिफारस केल्याचे समजते. यापूर्वी संघटनेमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक पदावर काम केलेले आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ब्लॉक अध्यक्ष, दोन वेळेला लोकसभा अध्यक्ष( युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष), प्रदेश युवक काँग्रेस च्या कार्यकारणी मध्ये त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचा राज्य समन्वयक म्हणून त्यांनी सबंध महाराष्ट्रभर उत्तम प्रशिक्षण शिबिर राबवण्याचे कार्य त्यांच्या हातून झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कमी वयात संघटनात्मक पातळीवर त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या