राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाच्या मागणीनंतर औसा शहरातील शौचालयांची कुलुपे उघडली; नागरिकांना मोठा दिलासा"

 "राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाच्या मागणीनंतर औसा शहरातील शौचालयांची कुलुपे उघडली; नागरिकांना मोठा दिलासा"




औसा प्रतिनिधी 


औसा (ता. औसा) – शहरातील दोन कोटी 29 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली सार्वजनिक शौचालये अनेक दिवसांपासून कुलूपबंद होती, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी औसा येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे  युवक अध्यक्ष मारुफ शेख यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते.


या निवेदनाची तात्काळ दखल घेत औसा नगर परिषदेकडून शहरातील सर्व स्वच्छता गृहांची कुलुपे उघडण्यात आली असून, नागरिकांना या सुविधांचा वापर करण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.


मारुफ शेख यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी वेळेवर नागरिकांच्या अडचणींवर प्रकाश टाकून प्रशासनाला कृती करण्यास भाग पाडले. नागरिकांनी या समस्येच्या त्वरित समाधानासाठी युवक अध्यक्षांचे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या