*ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा औसा येथे सत्कार*
औसा प्रतिनिधी -औसा तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने पंधरा वर्षाची अखंड परंपरा कायम राखत येथील केदारनाथ मंगल कार्यालयामध्ये आयोजित भव्य समारंभामध्ये इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रत्येक शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी सह प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शासकीय सेवा मध्ये यश संपादन केलेले गुणवंत व सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ पुष्पहार आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. सामाजिक कार्यकर्ते सुभाषप्पा मुक्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी जयसिंह जगताप उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे हे होते. वसंत महामुनी यांचा व व्यंकटेश औटी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक पदावर निवड झाली तसेच राठोड हे मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी श्री मुक्तेश्वर विद्यालय, वीरभद्रेश्वर प्रशाला, हसीना गर्ल स्कूल, अजीम हायस्कूल, राजर्षी शाहू विद्यालय, विवेकानंद विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय इत्यादी शाळेतून आणि श्री कुमार स्वामी महाविद्यालय व आझाद महाविद्यालयातून गुणांक्रमे प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ कोरे सर यांनी केले. काशिनाथ सगरे, सुभाष आप्पा मुक्ता आणि जयसिंह चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी चे मोफत प्रशिक्षण देण्याचे अभिवचन कॉम्प्युटर पार्कच्या वतीने काशिनाथ सगरे यांनी दिले. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे बी आर जाधवसर, मजहर ठेंगडे सर, पीव्ही जाधव, राम शिंदे, कमलाकर वैजवाडे ,ज्ञानोबा काळे, संभाजी शिंदे, अन्वर पटेल सर, अजहर पटेल, सुरेश स्वामी, राजेंद्र कदम, गोविंद लोकरे, सुदाम डेंग, विश्वनाथ बाडगिरे, नामदेव नलगे यांच्यासह पत्रकार राम कांबळे, वारकरी मंडळाचे आत्माराम मिरकले, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. औसा तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने गुणवंत विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यश मिळविलेल्या मान्यवरांचा केलेल्या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या