औसा येथे मुख्य हायवेवर ट्रॅव्हल्स ला लागली आग, काही क्षणातच गाडी जळून झाली खाक
.
औसा प्रतिनिधी.
औसा. पुणे येथून आलेली लोटस ट्रॅव्हल्स ला आज सकाळी पावणे सातच्या दरम्यान आग लागली आगीचे रुप इतके भयानक होते की धुराचे लोट पूर्ण शहरात पसरले होते.
आज सकाळी सगळीकडे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाच्या तयारीत असलेल्या नागरिकांनी वेगळीच चित्र पाहिले. 6. 45 मिनिटाला पुणे येथून लोटस ही ट्रॅव्हल्स MH11BK9752 औसा शहरात पोहोचली. मुख्य हायवेवर ऍप्रोच रोड येथे गाडीचे टायर फुटल्याने वायरिंग ला आग लागली व काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. या गाडीत मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते.सुदैवाने जिवित हानी झाली नाही.प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगा वस्तूसह जळून खाक झाल्या. प्रवास करत असलेल्या अनेकांचे पैसे त्या बॅगांमध्ये असल्या चे प्रत्यक्ष दर्शनी प्रवाशांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. काही स्थानिक लोकांनी तत्परता दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग लागली त्या वेळेला येथील नगरपालिकेच्या आग विझवणाऱ्या गाडीला बोलवण्यात आले.ही गाडी देखील लवकरच त्या ठिकाणी आली व गाडीतील कर्मचारी सुनील माने यांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला. तब्बल 40 मिनिटे आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक व कर्मचारी प्रयत्न करत होते. काही काळ मुख्य चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.थोड्या वेळात आगीवर नियंत्रण करण्यात यश प्राप्त झाले.यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व प्रवाशांची विचारपूस केली. डॉक्टर अफसर शेख यांनी सुनील माने यांच्या तत्परतेचा विचार करून त्यांना भेट स्वरूपात आर्थिक मदत केली.
0 टिप्पण्या