घाडगे पाटलावरील हल्लेखोरांना भारतीय न्याय संहिता अंतर्गत 109 कलमाखाली अटक करा अन्यथा शेतकऱ्याचे छावे गुन्हेगाराचा बंदोबस्त करतील
राजेंद्र मोरे क्रांतिकारी शेतकरी संघटना
औसा :राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून लातुरात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवेदन देताना विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे.ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हल्लेखोरांची भर चौकातून धिंड काढा असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे यांनी दिला आहे.राज्यात सर्वत्र गुंडाराज निर्माण झाले आहे. परवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा या आशयाचे निवेदन दिले होते. दरम्यान माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना शेतीचे प्रश्न आणि त्यावर विकासात्मक निर्णय घेऊन कृषी धोरण बनवणे अपेक्षित असताना कोकाटे मात्र विधानभवनासारख्या पवित्र सभागृहात मोबाईल वरती रमी गेम खेळताना संपूर्ण जगाने बघितले आहे. त्याचा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याने त्यांना तात्काळ पद मुक्त करावे अशी विनंती केली.त्याचवेळी प्रतिकात्मक स्वरूपात खासदार श्री तटकरे यांच्यासमोर रमी खेळण्याचे पत्ते ठेवून आपला संताप व्यक्त केला.शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सुलतानी अस्मानी संकटाचा ससे मिरा त्याचा सातत्याने पाठलाग करीत आहे. अशी चिंताजनक स्थिती राज्यात असल्याची जाणीव करुन देण्याच्या हेतूने निवेदन दिले होते परंतु काही वेळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी आमच्या तटकरे साहेबांसमोर असं कृत्य का केलं म्हणून विजयकुमार घाडगे पाटील यांना बेदम मारहाण केली.त्यांच्या अब्रूचे नुकसान केले आणि प्राणघातकी हमला केला सुदैवाने त्यात श्री घाडगे बचावले गेले ही कृती अतिशय चिंताजनक आणि निंदनीय आहे. राज्यभरातून झालेल्या घटनेविषयी तीव्र स्वरूपात निषेध सत्र सुरू आहे.श्री घाडगे पाटील हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून आरोपी वरती थातूरमातूर कलम टाकून गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे पाप सरकार करत आहे.सरकारने गांभीर्य ओळखून त्याला वेळीच आवरलं पाहिजे अन्यथा शेतकऱ्याची छावे रस्त्यावर उतरून गुन्हेगाराचा बंदोबस्त करतील अशी भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कोअर कमिटी सदस्य श्री राजेंद्र मोरे यांनी रास्ता रोको आंदोलनात घेतली आहे. राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन होत असताना औसा तालुक्यातील टाका पाटी येथे राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर वर प्रचंड मोठा रास्ता रोको करण्यात आला त्यावेळी श्री मोरे आंदोलकासमोर आपली भूमिका मांडत होते.भविष्यात अशा गुन्हेगारी प्रवृत्ती रोखायच्या असतील तर गुन्हेगारांना भर रस्त्यातून पोलिसांनी त्यांची धिंड काढत पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे नाहीतर बिहारची जनता सुद्धा म्हणेल आम्हाला महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको आहे अशी खरमरीत टीका पोलीस प्रशासन आणि सरकारवर करताना हा हल्ला विजय घाडगे वर नसून संपूर्ण शेतकऱ्यावर आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह छावा आणि विविध राजकीय पक्ष संघटनांच्या उपस्थितीत हा रास्ता रोको करण्यात आला.. शेती आणि शेतीचे प्रश्न घेऊन आगामी काळात जनतेने लोक चळवळी सोबत राहिलं पाहिजे तरच आपलं भविष्य व्यवस्थित असेल अन्यथा भ्रष्टाचार. गुन्हेगारी. लूटा लुट,खून दरोडे असे चित्र आपणास बघायला मिळेल.राष्ट्रीय महामार्ग तब्बल तीन तास रोखून धरत आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
0 टिप्पण्या