*भिसे हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा*
औसा प्रतिनिधी -औसा तालुक्यातील रुग्णांच्या सेवेमध्ये भिसे हॉस्पिटल या नवीन दवाखान्याचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता गीताई कॉम्प्लेक्स कोर्टासमोर मेन रोड औसा येथे संपन्न होत आहे या हॉस्पिटलचा शुभारंभ नाथ संस्थांचे पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर व सद्गुरु श्रीरंग महाराज औसेकर नाथ संस्थान औसा यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अभिमन्यू पवार राहणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी कीनिकर उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री संतोष मुक्ता, किरण उटगे, डॉक्टर शेख संतोष सोमवंशी, अमर खानापुरे सुनील मिटकरी, भरत सूर्यवंशी, डॉक्टर हनुमंत किनेकर रमेश बराटे शिवलिंगप्पा औटी, डॉ. सुनील चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी निमंत्रित बांधवांनी भिसे हॉस्पिटल च्या शुभारंभ प्रसंगी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान डॉ. विशाल भिसे छातीविकार व अतिदक्षता तज्ञ आणि डॉ. सौ कनुप्रिया भिसे भुलतज्ञ व अतिदक्षता तज्ञ माधवराव भिसे बालाजी भिसे सुग्रीव मुळे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या