लातूर रेल्वे प्रवासी संघाची आमदार अमित देशमुख यांच्याकडे ठोस मागणी..
औसा (प्रतिनिधी):
लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे सुविधा हे महत्त्वाचे पाऊल असून, विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी लातूर रेल्वे प्रवासी संघाने ठोस मागण्या सादर केल्या आहेत. यासाठी लातूरचे आमदार अमित देशमुख यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले.
संघाचे अध्यक्ष आकाश कांबळे, उपाध्यक्ष कुलकर्णी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आलेल्या या निवेदनात पुढील मुख्य मागण्या करण्यात आल्या:
लातूर - कलबुर्गी (गुलबर्गा) मार्गाने औसा मार्गे नवीन रेल्वेमार्गाची निर्मिती.
लातूर रोड - नांदेड नव्या रेल्वेमार्गास गती देणे व महाराष्ट्र शासनाने ५०% हिस्सा मंजूर करणे.
लातूर रोड - जळकोट - बोधन बॉड ग्रेज रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाकडून ५०% वाटा मंजूर करणे.
लातूर रोड - कुर्डुवाडी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण तातडीने करणे.
लातूर रेल्वेस्थानकातील पिटलाईनचे काम संथ गतीने सुरू असून, त्यास गती देणे आवश्यक.
लातूर - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सकाळच्या सत्रात सुरू करणे.
मुंबई - चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस लातूर मार्गे सुरू करावी.
पुणे - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस लातूर मार्गे सुरू करावी.
लातूर रेल्वेस्थानकावर नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ३/४ ची निर्मिती तातडीने करावी.
या मागण्यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील प्रवासी सुविधा वाढवण्याबरोबरच औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.
लातूर रेल्वे प्रवासी संघाने व्यक्त केलेली ही मागणी जिल्ह्याच्या भावी प्रगतीचा मजबूत पाया ठरणार असल्याचा विश्वास संघाने व्यक्त केला आहे. आमदार अमित देशमुख यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
0 टिप्पण्या