अमोल कोचेटा यांच्या सतर्कतेमुळे पैसे चोरणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात
औसा प्रतिनिधी
औसा येथील विजय जनरल स्टोअर्स चे संचालक अमोल सुभाषचंद्र कोचेटा यांच्या सतर्कतेमुळे बेलकुंड येथील ज्येष्ठ नागरिकाचे पैसे चोरणाऱ्या दोन पर प्रांतातील महिलांना पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 23 जुलै 2025 रोजी दुपारी अमोल कोचेटा यांच्या विजय जनरल स्टोअर्स अँड प्रोविजन या दुकानांमध्ये तालुक्यातील बेलकुंड येथील ज्येष्ठ नागरिक आपसिंगेकर हे भारतीय स्टेट बँकेतून पैसे घेऊन किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते. बँकेपासून त्यांच्यावर पाळत ठेवत पर राज्यातील दोन महिलांनी विजय जनरल अँड प्रोविजन स्टोअर्स मध्ये प्रवेश करीत नक पॉलिश व इतर किरकोळ साहित्याची विचारणा करीत अपसिंगेकर यांच्या वायरच्या पिशवीला ब्लेडने कापून पैसे चोरत असल्याचे विजय जनरल चे संचालक अमोल कोचेटा यांच्या लक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आल्यानंतर त्यांनी दोन्ही महिलांना सीतापिने पकडून दुकानाचे शटर बंद करून पोलिसांना फोन करून बोलावून घेतले सदरील दोन महिला ह्या परराज्यातील असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरलेल्या रोकडचा पोलिसांनी पंचनामा करून खातर जमा केली परराज्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन्ही चोरट्या महिलावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. असल्याचे कळते.हा प्रकार औसा बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या विजय जनरल अँड प्रोविजन स्टोअर्स मध्ये दिनांक 23 जुलै रोजी भर दिवसा झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या