मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औशात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!

 मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औशात  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!









औसा (प्रतिनिधी):

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे एक प्रेरणादायी आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. "नाथ मंगल कार्यालय"  औसा येथे झालेल्या कार्यक्रमात २२५ गरजू विद्यार्थ्यांना  आज दिनांक 23 जूलै बुधवार रोजी शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्यात शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण करण्यात आला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.


या उपक्रमाचे आयोजन सुनीलप्पा उटगे मित्रमंडळ आणि भारतीय जनता पार्टी, औसा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. समाजातील वंचित घटकांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.


 या कार्यक्रम प्रसंगी किरणप्पा उटगे, सुशील दादा बाजपाई, प्रा. भिमाशंकरप्पा राचट्टे, अकरमखां पठाण, महादेव कटके, अरविंद कुलकर्णी, संधीपान जाधव,शिवकुमार मुरगे, मुन्ना वागदरे, सौ. कल्पनाताई डांगे, गोपाळ धानोरे, कारंजे जयराज, भिमिशंकर मिटकरी,भागवत माळी, रेवन भागुडे, निळकंठ मुळे, पवन नागराळे, अमित राचट्टे, चाऊस सर आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरला असून, गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम एक सशक्त प्रेरणा ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या