आगामी निवडणुका संदर्भात एएमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्षाची भेट ..
औसा प्रतिनिधी : - औसा तालुक्यातील आगामी निवडणुका संदर्भात ए आय एमआयएम औसा शिष्टमंडळाने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील व महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर यांची भेट घेऊन आगामी निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी आगामी निवडणुका संदर्भात ए आय एमआयएमचे औसा तालुका प्रमुख ॲड गफरुल्लाह हाश्मी यांच्या अध्यक्षतेखाली औसा तालुक्यात होणाऱ्या नगर पालिका, नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका ए आय एमआयएम पक्ष पुर्ण ताकदीने लढवणार आहे व तालुक्यात ए आय एमआयएम पक्षाला बळकटी देवून पक्ष वाढीसाठी जे काही करता येईल त्यासाठी ए आय एमआय एम सक्षम राहील अशा अनुभवातून सिध्द होईल,यावर प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली व या चर्चे दरम्यान ए आय.एमआय एम पक्षाच्या वतीने लवकरच लातूर जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करून पुढील तारीख जाहीर करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.या महत्वपूर्ण बैठक औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथील कलेक्टर ऑफिस परिसरातील ए आय एमआयएमचे प्रदेश कार्यालयात तसेच विविध विषयांवरही चर्चा झाली या बैठकीस तालुक्यातील ए आय एमआय एम चे तालुका प्रमुख ॲड गफरुल्लाह हाश्मी, शहर प्रमुख सय्यद कलीम, कोषाध्यक्ष शकील देशमुख, रहीम महेताब तांबोळी, सय्यद जैद कलीम यांच्यासह तालुक्यातील ए.आय.एम आय एम चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या