जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धापूर्व बैठक संपन्न.

 जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धापूर्व बैठक संपन्न.


.

औसा प्रतिनिधी 

शैक्षणिक वर्ष 2025 - 26 मधील औसा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धापूर्व बैठक शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी ऑलमला ता. औसा ,जि.लातूर येथे जिल्हा क्रीडाअधिकारी मा.श्रीमहादेव कसगावडे  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीस विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव बस्वराज धाराशिवे , सहसचिव महादेव खिचडे, जिल्हा क्रीडा कार्यालयातील  क्रीडाअधिकारी कैलास लटके, बाळासाहेब इंगोले,धीरज बावणे, कृष्णा केंद्रे , क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर,जयराज कसबे,पंचायत समिती औसा येथील कर्तव्यदक्ष अधिकारी गोविंद राठोड ,औसा तालुका क्रीडासंयोजक रंगनाथ अंबुलगे, ब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कूल आलमला च्या प्राचार्या सौ. स्वाती कापसे, प्राचार्य शेख सर, हनुमान विद्यालय शिवलीचे माजी मुख्याध्यापक संदीपान माळी, क्रीडा शिक्षक वैभव सोनवणे, जेष्ठ क्रीडाशिक्षक शिंदे सर, सुभेदार सर, नेताजी सावंत सर दिलीप साळूंके सर,तसेच तालुक्यातील विविध शाळेतून आलेले क्रीडा शिक्षक बैठकीस उपस्थित होते.ऑनलाईन फार्म भरताना येणाऱ्या अडी -अडचणी व क्रीडा स्पर्धा पार पाडत असताना येणाऱ्या अडचणी क्रीडा शिक्षकांनी मांडल्या.त्यावर जिल्हा क्रीडाअधिकाऱ्यांनी  समाधानकारक उपाय सुचविले व सविस्तर मार्गदर्शन केले.तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता तसेच आपल्या तालुक्यातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करता येईल याबाबत व इतर सर्वच विषयावर सविस्तर अशी चर्चा करून पुढीलप्रमाणे खेळ व स्पर्धेचे ठिकाण निश्चित करण्यात आले.(1) कबड्डी -आश्रम शाळा देवताळा(2) मैदानी स्पर्धा - जि.प.प्रा.शा.लामजना(3) बुद्धिबळ -श्री नेताजी विद्यालय सिंदाळा (4) व्हॉलेबॉल -श्री हनुमान विद्यालय शिवली.(5) फुटबॉल -इम्युनिअल इंग्लीश स्कूल दापेगांव (6)क्रिकेट-  ब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कूल आलमला(7)खो-खो, -रामनाथ विद्यालय आलमला (8)योगा-रामनाथ विद्यालय आलमला(9) बॅडमिंटन -रामनाथ विद्यालय आलमला(10) कुस्ती -रामनाथ विद्यालय आलमला. इत्यादी ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्या बाबत चर्चा करण्यात आली. वेळेनुसार ठिकाणात अंशतः काही बदल करण्यात येतील असे क्रीडा संयोजक अंबुलगे सरांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगगुरु नेताजी सावंत सरांनी केले,प्रास्ताविक सहसचिव महादेव खिचडे सरांनी केले.जिल्हा क्रीडाअधिकारी महादेव कसगावडे  यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.                   सुभेदार सर आणि क्रीडाअधिकारी कैलास लटके यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा संयोजक रंगनाथ अंबुलगे, प्राचार्या स्वाती कापसे,शेख सर, नेताजी सावंत,वैभव सोनवणे,शिवराम शिंदे,मुसांडे सर, शिवलिंगेश्वर कॉलेजमधील सेवक व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.व बैठक खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या