ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त औसामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन...

 ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त औसामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन...









औसा (प्रतिनिधी): धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख जयश्रीताई उटगे यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

या समाजोपयोगी उपक्रमांची सुरुवात नगरपालिकेच्या महिला सफाई दूत शकुंतला कांबळे आणि ज्येष्ठ पत्रकार रमेश दूरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आली.

या  सामाजिक उपक्रमांमध्ये:

 पत्रकार बंधू ,औसा नगरपरिषदेचे कर्मचारी व सफाई कर्मचारी आणि पोलिस ,  त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 सिद्धेश्वर प्राथमिक शाळा व बालभवन येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 औसा येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले.

  श्री बसवेश्वर माध्यमिक विद्यालय, किनी थोट (ता. औसा) येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून औशामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचा वाढदिवस  विधायक पद्धतीने साजरा करण्यात आला. या आरोग्य शिबिरात औसा येथील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने नांव नोंदणी करून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या आरोग्य शिबिरात औसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, डॉ. कुलकर्णी, डॉ. नलगोडे, डॉ. म्हस्के, डॉ. एंबडवार आणि कर्मचारी अर्चना सगर, रेश्मा कांबळे, श्रीनिवास मुदगड, अतुल कांबळे, वंदना यांच्या पथकाने मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रम प्रसंगी 

 महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख जयश्रीताई उटगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, सचिव महबूब बक्षी, ज्येष्ठ पत्रकार रमेश दूरकर, राम कांबळे, विनायक मोरे, औसा शहरप्रमुख सुरेशदादा भुरे, माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे, शहर संघटक गोविंद खंडागळे, माजी शहरप्रमुख जयंत चंदनशिवे, अशोक कुंभार, विलास शिंदे, बाळू नरवाडे, युवा सेना शहरप्रमुख आकाश माने, किरण कदम, सचिन पवार, औसा पोलिस स्टेशनचे कर्मचारी, नगर परिषदेचे पदाधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी,आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमांतून समाजप्रेम आणि सेवाभावाची प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी आवर्जून नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या