औसा शहरात लातूर वेस ते हाश्मी चौक या मुख्य रस्त्यावर फेरीवाला झोन घोषित करा !

 औसा शहरात लातूर वेस ते हाश्मी चौक या मुख्य रस्त्यावर फेरीवाला झोन घोषित करा !



औसा प्रतिनिधी 


औसा: नगर परिषद अधिनियम १९६५ नुसार औसा शहरातील लातूर वेस परिसर ते हाश्मी चौक या रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक फेरीवाला झोन घोषित करून औसा नगरपालिकेकडे अधिकृत नोंदणी असलेल्या ५०० वर फेरीवाल्यांना ओळखपत्रे द्यावेत, अशी मागणी सर्व पक्षीय व शहर पथ विक्रेते न प समितीच्या व औसा शहर काँग्रेसच्यावतीने नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली. काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष खूनमीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.


महाराष्ट्र एकता हॉकर्स युनियन विरुद्ध मुंबई महापालिका यांच्या २००३ मध्ये झालेल्या निकालाचा संदर्भ देत हे


पुख्याधिकारींना


निवेदन देण्यात आले. औसा शहरातील नगर पालिकेच्या मार्फत केंद्र शासनाच्या स्वनिधी माध्यमातून शहरातील शेकडो फेरीवाल्यांना दहा हजार रु., वीस हजार रु. अशी आर्थिक मदत देऊन त्यांना त्यांचा व्यापार सक्षम करण्यास मदत करण्यात आलेली आहे. ११ जुलै रोजी औसा नगर पालिका व औसा पोलीस प्रशासनाच्या


वतीने लातूर वेस परिसरातील स्थानिक फेरीवाल्यांवर अचानक कार्यवाही करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले.


भारतीय संविधान कलम १९ (१) (जी) नुसार त्यांना आठ मिटरच्यावर रुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूंना आपला व्यवसाय करण्याचा मौलीक अधिकार आहे. असे असताना प्रशासन यांनी


फेरीवाला अधिनियम १९६५ ची पडताळणी न करता नियमबाह्य कार्यवाही करून गोरगरीबांवर नाहक कार्यवाही केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.


औसा नगरपालिका स्थापनेनंतर साठ वर्षे उलटली असतानाही पालिकेने फेरीवाला झोन घोषित केला नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पालिकेने शहरात विविध ठिकाणी फेरीवाला झोन घोषित केला असता तर कार्यवाहीची ही वेळ आली नसती, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे लातूर वेस परिसर ते हाश्मी चौक या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांना झोन घोषित करावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.यावेळी गोंवीद जाधव, माजीद काझी,नियामत लोहारे, संतोष कांबळे,महेदी पठाण,गौसोद्दीन जर्दी,आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या