जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरगा येथे विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप..

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरगा येथे विद्यार्थ्यांना  शालेय किट वाटप..


औसा प्रतिनिधी 


 आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरगा येथे पीपल सिव्हिलायझेशन फाउंडेशन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिलीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पीपल एज्युकेशन फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बिराजदार यांच्यावतीने प्रशांत लामतुरे, महानंदा लामतुरे, नानासाहेब भोसले, लक्ष्मण मंडाळे गावचे सरपंच रविकांत निकम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील सोनवणे, व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश निकम, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी नानासाहेब भोसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची घटत चाललेले विद्यार्थी संख्या पालकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाच्या बाबतीत पालकाची उदासीनता या बाबीवर चिंता व्यक्त केले त्यामुळे त्यांच्या संस्थेने या विद्यार्थ्यांसाठी शालेय किटचे वाटप करण्याचे ठरवले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कार्यात मदत व्हावी हा उदात्त हेतू ठेवून या किटचे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या