औसा तालुक्यात मुस्लिम भीम संघच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड...

 औसा तालुक्यात मुस्लिम भीम संघच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड...








तालुकाध्यक्षपदी गायकवाड तर शहराध्यक्षपदी बक्षी 






औसा प्रतिनिधी १३ जुलै २०२५ रोजी औसा तालुक्यात मुस्लिम भीम संघची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृह, औसा येथे रविवारी (१३ जुलै २०२५) झालेल्या या बैठकीत जिल्हाध्यक्ष इलियास चौधरी, संस्थापक अध्यक्ष चांदपाशा लोणे, उपाध्यक्ष सोहेल शेख, कोषाध्यक्ष लोंढे, सचिव महादेव बनसोडे आणि सहसचिव सद्दाम पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

या निवडीमध्ये नामदेव संधिपान गायकवाड यांची औसा‌तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर औसा शहराध्यक्षपदी अनिस बक्षी यांची निवड करण्यात आली आहे.यादव सखाराम कावळे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तसेच, महेबुब कुरेशी यांना शहर महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने गमजा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महेबुब कुरेशी, अतीख शेख, सोहेल इनामदार, यादव कावळे, सुर्यवंशी आदित्य, शाहीद मुंगले, रहीम शेख, शेख रिजवान, ताहेर शेख, जाहीद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना, नवीन कार्यकारिणीने संघटना मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी उत्साहाने जबाबदाऱ्या स्वीकारल्याचे सांगितले. आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. या निवडीमुळे मुस्लिम भीम संघ औसा तालुक्यात सामाजिक सलोखा आणि विकासासाठी अधिक सक्रिय होईल अशी अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या