शेतरस्ते संदर्भात आ अभिमन्यू पवार यांची लक्षवेधी....

 शेतरस्ते संदर्भात आ अभिमन्यू पवार यांची लक्षवेधी.... 




 उच्चस्तरीय समिती गठीत करणे आणि समितीच्या शिफारशीनुसार शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. 





औसा - शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शेतरस्तेसंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. 'शेतरस्त्यांची संपूर्ण जबाबदारी महसूल विभागाने घ्यावे, शेतरस्त्यांसाठी २५१५ सारखा स्वतंत्र लेखाशिर्ष निर्माण करून शेतरस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्थानिक पातळीवरील शेतरस्तेसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली व संबंधित सर्व खातेप्रमुखांचा समावेश असलेली समिती तालुकानिहाय गठीत करण्यात यावी" आदी मागण्या आ अभिमन्यू पवार यांनी सदरील लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे मांडल्या.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात सकारात्मक उत्तर दिले, सदरील विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सभागृहात निवेदन केले.  महसूल मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली १ उच्चस्तरीय समिती गठीत केली जाईल, सदरील समिती पुढील ५ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील १००% शेतरस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी कोणते निर्णय घेणे अत्यावश्यक आहे याचा अहवाल १ महिन्यात सरकारला सादर करेल आणि समितीच्या शिफारशीनुसार सरकार पुढील अधिवेशनात निर्णय घोषित करेल/निधीची तरतूद करेल" अशी घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 


             यावेळी आ अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघात बाराशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते आमदार निधीतून तयार केल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणी, वीज व शेतरस्ता हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. 

......... 


शेतरस्तेसंदर्भात भूतकाळात कधीही घेतले गेले नाहीत असे सुधारणावादी निर्णय विद्यमान सरकाकडून घेतले जात आहेत, त्यामुळे मागच्या ५-६ वर्षांपासून आ अभिमन्यू पवार पाठपुरावा करत असलेले शेतरस्तेसंदर्भातील उर्वरित विषयही लवकरच मार्गी लागतील असा विश्वास आ अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या