निष्ठावंत शिवसैनिक हीच आमची ताकद - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
कारणं नको ,काम दाखवा -शिवसेना उपनेते शरद दादा कोळी
पक्षाच्या आढावा बैठकीसाठी काल लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. चंद्रकांत जी खैरे साहेब व शिवसेनेचे उपनेते श्री शरद दादा कोळी हे औसा शहरात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते...
श्री खैरे यांनी अनेक वर्ष मराठवाड्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता, शिवसैनिक त्यांना चांगल्याच पद्धतीनं परिचित आहेत. ज्या ज्या वेळी त्यांच्याकडे लातूर जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली त्या त्या वेळेस त्यांनी पक्षाला महानगरपालिकेतील नगरसेवक, नगरपरिषदचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य असे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी पक्षाला दिले आहेत.
औसा येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी शिवसेनेचे मनोबल वाढवले व आपल्या भाषणात अनेक गोष्टींना उजाळा देऊन बाळासाहेबांची शिवसेना ही शिवसैनिकाच्या ताकदीवर उभी आहे. शिवसेना संपवण्याच्या नादात अनेक लोकं संपून गेली पण आज ही शिवसेना खंबीरपणे उभी आहे .गद्दारी करणाऱ्यांना बाळासाहेबांचा शिवसैनिक त्यांची जागा दाखवून देईल. असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले
शिवसेनेचे उपनेते शरद दादा कोळी यांनी पदाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला .आपल्या भाषणात पक्षाची पद हे फक्त मिरवायसाठी नसून संघटना वाढवण्यासाठी आणि लोकांचे काम करण्यासाठी असतात, त्यामुळे येणाऱ्या काळात पदाधिकाऱ्यांसह सर्व शिवसैनिकांनी अंग झटकून कामाला लागावे अशी सुचना बैठकीत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्या.
औसा तालुक्यातील शिवसेनेचा लेखाजोखा शिवसेनेच्या जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे यांनी नेत्यांसमोर मांडला.
सदरील आढावा बैठकीला जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक ,जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी ,उपजिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुकाप्रमुख आबासाहेब पवार, शहर प्रमुख सुरेश दादा भुरे ,श्रीराम कुलकर्णी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जवळे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुनिता ताई भोसले , मीडिया प्रमुख विशाल पवार , संचालक संतोष भोसले ज्येष्ठ शिवसैनिक संकट नाना माने, जयंत चंदनशिवे, गोविंद खंडागळे, अशोक कुंभार, विलास शिंदे ,मंगल आवटे , किरण कदम ,सचिन पवार असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाला साडेचार तास उशीर झाला असताना सुद्धा पदाधिकाऱी, शिवसैनिक नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी तटस्थ बसून होते दोन्ही नेत्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या