भादा येथे "छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान" शिबिर संपन्न
बी डी उबाळे
औसा:तालुक्यातील भादा येथे बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी "छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान" शिबिर संपन्न.
या शिबिरामध्ये शेतकरी नागरिकांना शासनाच्या महत्त्वाच्या सेवा आणि योजनांचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था शासनाकडून करण्यात आली होती.यामध्ये फेरफार आणि ७/१२ चे वाटप
अॅग्रीस्टॅक अॅप शेतकरी ओळखपत्र नोंदणी व मान्यता विद्यार्थी व महिलांसाठी रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले,रेशनकार्ड वाटप,संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या सामाजिक लाभाच्या योजनांची माहिती व लाभ भटक्या विमुक्त जातींच्या नागरिकांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन,शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ योजनांसंदर्भात तुमच्या तक्रारींचे निराकरण या शिबिरात महसूल, निवडणूक, कृषी,आरोग्य,पशुधन विकास, आणि पुरवठा विभागांचे स्टॉल उपलब्ध असतील, जिथे तुम्हाला संबंधित योजनांची माहिती मिळेल आणि आवश्यक कार्यवाही करता येईल. अशी सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे..
यावेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ,मंडळ अधिकारी स्वाती वाघे, भादा तलाठी राम दुधभाते वैदकीय अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, पशु वैदकीय अधिकारी, मंडळा मधील सर्व तलाठी, ग्रामसेवक, उपसरपंच बालाजी शिंदे, अमोल पाटील, गोरख बनसोडे,अर्जुन लटूरे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत पाटील, गोविंद पाटील, सुरेश लतुरे, पापू पठाण व इतर नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या