बोरगाव - काळमाथा रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप
तहसीलदार च्या आदेशालाही मानायला तयार नाहीत शेतकरी
औसा-(सा.वा)दि. 24
औसा तालुक्यातील काही गावांना दोन आमदार असून देखील विकासाची कामे गावापर्यंत अध्याप पोहोचलेली नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
पूर्वी बोरगाव नकुलेश्वर येथे दहा गावचे लोक येथील आठवडी बाजारात येत असत परंतु बदलत्या काळानुसार आता जवळपास सर्वच गावात आठवडी बाजार भरत असल्याने बोरगाव नगरीमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या जरी कमी झाली असली तरी अजूनही तीन ते चार गावचे नागरिक गुरुवारी असणाऱ्या बोरगाव नगरीतील आठवडी बाजाराला येऊन हजेरी लावतात आणि त्या ठिकाणी किमान आठ दिवस पुरेल एवढे साहित्य खरेदी करून घेऊन जातात त्यात बोरगाव-आंदोरा बोरगाव-वडजी-बोरगाव- काळमाथा बोरगाव-कवठा बोरगाव-भेटा आणि बोरगाव-भादा इत्यादी गावातील नागरिक आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत परंतु या गावाला आमदार हे दोन असून दोन्हीही आमदार भाजपाचेच असल्याने या भागातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे.
हे सर्वच यावे किमान तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर असून एकमेकाला अंतर्गत जोडलेले असल्याने सदरील रस्ते पूर्वीपासून जुने असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत परंतु त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्याने या भागातील काही शेतकऱ्याने तर शेतातच आपले घर थाटलेली आहे. ते केवळ आणि केवळ गावातून शेताला जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्यानेच येथील शेतकऱ्यावर अशा प्रकारची वेळ आलेली आहे.
औसा काळमाथा रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केले असल्याने मंजूर असलेला रस्ता येथील शेतकरी होऊ देत नसल्याने तहसीलदार औसा याने संबंधितास नोटीस पाठवलेली असून देखील येथील शेतकरी रस्ता होऊ देत नसल्याने औसा तहसीलचे तहसीलदार घनश्याम अडसूळ याने परत भूमी अभिलेख कार्यालय औसा, मंडळ अधिकारी औसा पोलीस स्टेशन भादा आणि ग्राम विस्तार अधिकारी बोरगाव यांना नोटीस पाठवून तात्काळ मोजणी फीस भरून रस्त्याचे थांबलेले काम त्वरित करण्याचा आदेश काढला आहे.
0 टिप्पण्या