एमआयएमच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद – जिल्हाध्यक्ष अॅड. मुहम्मद अली यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये यशस्वी आयोजन..
औसा प्रतिनिधी
लातूर, 26 जून 2025 (गुरूवार) –
लातूर येथील 60 फुट रोडवरील एम के फंक्शन हॉल येथे आज ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चा जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडला. हा मेळावा एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष अॅड. मुहम्मद अली यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला लातूर शहर तसेच तालुक्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या निमित्ताने पक्ष संघटन, सामाजिक प्रश्न, आगामी निवडणुका व जनतेशी जोडलेली कामे यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. अॅड. मुहम्मद अली यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांची आठवण करून देत, अधिक जोमाने मैदानात उतरण्याचे आवाहन केले.
अॅड. मुहम्मद अली म्हणाले, "एमआयएम पक्ष हा जनतेच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार व मुस्लिम समाजासह सर्व वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही सदैव उभे आहोत. आजचा मेळावा हा नवचैतन्य निर्माण करणारा टप्पा ठरेल."
मेळाव्याचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह स्पष्ट जाणवत होता. स्थानिक पातळीवरील नेतृत्व, युवकांचे प्रतिनिधी आणि एम आय एम चे पदाधिकारी यांनी देखील आपले विचार मांडले.
हा मेळावा लातूर जिल्ह्यातील एमआयएम पक्षाच्या संघटनबांधणीसाठी एक महत्त्वाची पायरी ठरली असून, आगामी काळात अधिक ठोस पावले उचलली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
0 टिप्पण्या