आणीबाणीतील बंदिवान स्वतंत्रता सेनानीचा औसा येथे सन्मान...
औसा प्रतिनिधी
दिनांक 25 जून 1975 रोजी देशात एका काळ रात्रीची सुरुवात झाली आणि तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशभरामध्ये आणीबाणी लागू करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना 25 जून 1975 रोजी अचानक रात्रीतून पकडून बंदीवासात पाठवले होते वास्तविक पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी देशांमध्ये प्रखर राष्ट्रवादीची भूमिका बजावून संघ कार्यामध्ये झोपून दिले होते अशा या आणीबाणीच्या काळामध्ये बंदी वास भोगलेल्या स्वतंत्रता करा सेनानींचा औसा येथे ह भ प दत्तात्रेय पवार गुरुजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी प्रभू आप्पा राचट्टे यांचे पुत्र रविशंकर राज शेट्टी, संदीपान जाधव, व्यंकट नाना मोरे, दासराव पांचाळ, शिवरुद्र धाराशिवे, विजय धाराशिवे, तुकाराम सूर्यवंशी, वाघन मेत्रे, भिकन मुंगले,श्रीमती उषा पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते सुशीलकुमार बाजपाई, कंठप्पा मुळे, अरविंद कुलकर्णी, अक्रम खान पठाण, सुनील उटगे, वीरभद्र कोपरे, शिवरुद्र मुरगे, संतोष चिकुर्डे कर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या