*छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर..
औसा प्रतिनिधी -सारथी संस्थेमार्फत छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सारथी विभागीय कार्यालय, लातूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सारथी संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून सारथी संस्थेचे लातूर विभागीय कार्यालय जुने जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे सुरु झालेले आहे. सारथी लातूर विभागीय कार्यालयांतर्गत लातूर, परभणी, बीड व उस्मानाबाद (धाराशिव) या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, MPSC-UPSC व इतर स्पर्धा परीक्षा परीक्षेचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतक-यांना कृषी व कृषी पूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन इत्यादी प्रकारचे विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्याचे कामकाज सारथी संस्थेमार्फत केले जाते.
छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या लातूर येथील विभागीय कार्यालय येथे बुधवार, दिनांक २५ जून, २०२५ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामाजिक बांधीलिकी जपून ४४ रक्तदाते यांनी सदर शिबिरामध्ये रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला आहे. सदर रक्तदान शिबीर सारथी विभागीय कार्यालयाचे उप व्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी श्री. राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आला. यावेळी mkcl मराठवाडा समन्वयक महेशजी पत्रिके, लातूर llc आलोक मालू सर,औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे ,संजय स्वामी सर, असिफ सर, कडतने सर, कलीम सर, मान्यवर उपस्थित होते.तसेच सारथी विभागीय कार्यालय, लातूर येथील अधिकारी व कर्मचारी तसेच सारथी संस्थेच्या अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थी व MKCL लातूर येथील केंद्रप्रमुख यांनी सुद्धा सदर रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. अजय वाघमारे यांनी केले व उप व्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी श्री. राहुल जाधव यांनी लातूर येथील शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय रक्त संकलन टीम व रक्तदाते यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या