हणमंत भैय्या राचट्टे यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमांनी साजरा..

 हणमंत भैय्या राचट्टे यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमांनी साजरा..





औसा प्रतिनिधी 


औसा, 26 जून..

 औसा येथील मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिप्पणप्पा प्रभुप्पा राचट्टे यांचे पुत्र भाजपा चे युवा नेते  हणमंतप्पा  तिप्पणप्पा  राचट्टे यांच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त औसा येथे शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्या निमित्ताने दिनांक 26 जून गुरुवार रोजी हॉटेल साईप्रसाद तुळजापूर रोड,औसा येथे हणमंत भैय्या मित्र मंडळाच्या वतीने 38 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप ह भ प दत्तात्रय पवार गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी मोठा हातभार लागला.

श्री. राचट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला औसा येथील मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलींगप्पा औटी, मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिप्पणप्पा राचट्टे,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, राष्ट्रवादी अजित पवार गटचे युवा नेते सुलेमान शेख,रिंगण लाईव्ह चे संपादक राजू पाटील, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगरे, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रविशंकर राचट्टे,समृध्दी आटाचे संचालक ईश्वराज औटी,धम्मदीप जाधव, जगदीश स्वामी,भाजपा शहर मंडळाचे अध्यक्ष शिवरुद्र मुर्गे, मंगेश जाधव, बाळू ढोले, वारकरी शिक्षण संस्थेचे अजय पाटील,औसा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विकास नरहरे, सुलतान शेख, अविनाश पवार, इम्रान सय्यद, दर्शन मसलगेकर, अँड दिपक राठोड, किशोर पारोडकर,आदि परिसरातील अनेक नागरिक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री. राचट्टे यांनी, "समाजातील गरजू घटकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा सायकल वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. या सायकलींमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोपे होईल आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही,"‌व तसेच माझ्यासाठी  शुभेच्छा व्यक्त करताना आपण पारंपरिक पद्धतीने शाल, हार,फुलांची बुके,केक किंवा  इतर भौतिक उपहार आणण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी  शैक्षणिक साहित्य  देण्याच्या  या नव्या पहलेत सामील व्हा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे नियोजन हणमंत भैय्या मित्र मंडळ भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केले होते. सायकल मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. अनेक पालकांनीही या उपक्रमाबद्दल श्री. राचट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही श्री. हणमंतप्पा राचट्टे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, श्री. राचट्टे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात आणि त्यांचा वाढदिवस एक अतिशय स्तुत्य आणि  अत्यंत प्रेरणादायी  उपक्रम आहे.

एकंदरीत, हणमंतप्पा राचट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा सायकल वाटप कार्यक्रम केवळ त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव नसून, समाजाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक ठरला. यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या