* *राजीव गांधी पॉलिटेक्निक मध्ये छत्रपति शाहू
महाराज जयंती साजरी..
* औसा प्रतिनिधी
*
सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि समाजसुधारक राजश्री छत्रपति शाहूमहाराज यांच्या
151 व्या जयंतीनिमित्त राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक समता, शिक्षण, आणि
बंधत्वाच्या मुल्यांचा प्रसार करणाऱ्या शाहूमहाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचा वारसा
पुढेनेहण्याचा संकल्प केला,
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भिमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे प्राचार्य संतोष मेतगे, उपप्राचार्या योगिता मेतगे प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला प्राचार्य सोनहिवरे एम जी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या