नाशिकच्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने रिंगण कार राजू पाटील यांचा सन्मान..
औसा प्रतिनिधी
रिंगण लाईव्ह चे मुख्य संपादक आणि ग्रामीण भागातून गावकऱ्याचे मनोगत या दैनिकातून निर्भीडपणे पत्रकारिता करणारे औसा तालुक्याचे भूमिपुत्र राजू शंकरराव पाटील यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा पत्रकारितेचा राष्ट्रीय कोहिनूर पुरस्कार रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी नाशिक येथे आयोजित एका शाही समारंभामध्ये प्रदान करण्यात आला रिंगण लाईव्ह चे मुख्य संपादक राजू पाटील यांना पत्रकारितेचा राष्ट्रीय कोहिनूर पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिप्पण आप्पा राजट्टे, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंग आप्पा औटी, मुक्तेश्वर देवालय न्यासचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वागदरे, अँड बी एस कारंजे, युवराज हलकुडे, धनंजय कोपरे, प्रकाश वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रविशंकर राचट्टे ,मनोगत युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत राचट्टे, समृद्धी आटाचे संचालक विश्वराज औटी, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, उपाध्यक्ष नागेश येळेकर, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, पत्रकार राम कांबळे, रमेश दूरुगकर, विजय बोरफळे, संजय सगरे, विनायक मोरे, इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या