औसा शहरातील पोलीस वसाहतीची दुरावस्था कधी दूर होणार
..
औसा प्रतिनिधी
औसा शहरात मागील अनेक दिवसांपासून पोलीस वसाहतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून येथील पोलीस कॉर्टर भग्न अवस्थेत पडले आहे पोलीस इन्स्पेक्टर यांचे निवासस्थान व सर्व पोलीस बांधवांच्या वसाहतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे औसा शहरांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेड कॉन्स्टेबल 60 ते 65 जणांचा स्टाप असून जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या पोलीस बांधवांना मात्र राहण्यासाठी कॉर्टर्स नसल्यामुळे त्यांची अत्यंत गैरसोय होत आहे. 50 ते 60 वर्षांपूर्वी जुन्या पद्धतीने केलेले बांधकाम पूर्णतः कोसळले असून येथील पोलीस बांधवांना खाजगी मालकीच्या घराचा आधार घ्यावा लागत आहे मागील अनेक वर्षापासून सातत्याने पोलीस वसाहतीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठाकडे दिले आहेत परंतु अद्याप पोलीस वसाहतीचे काम मार्गी लागले नाही राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे पोलीस वसाहतीची नव्याने निर्मिती करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
0 टिप्पण्या