लातूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था कडे लक्ष द्या -महाविकास आघाडीची पालकमंत्री यांना मागणी..

 लातूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था कडे लक्ष द्या -महाविकास आघाडीची पालकमंत्री यांना मागणी..




औसा प्रतिनिधी 

लातूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था कडे लक्ष द्यावे या मागणीसाठी आज औसा येथील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी औसा येथील विश्रामगृह येथे  लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन  आणि त्यांच्या सोबत औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे 


लातूर जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था पहाता आपण महाराष्ट्रात राहतो की 'बिहार' मध्ये असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.


महिला/मुलींच्या सुरक्षतेची समस्या खुप मोठी आहे. आपण राजे आहात, आपल्याकडून विशेष महिला वर्गाला खुप अपेक्षा आहेत पालकमंत्री म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही आपली आहे.


पालकमंत्री हे, त्या-त्या जिल्ह्याचे पालक असतात. त्या अनुषंगाने जिल्ह्याचा विकास करत असताना विरोधी पक्षानांही विश्वासात घेऊन, त्यांच्याशी समन्वय साधुन सर्वांना समान न्याय देण्याचा आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे.


जिल्हातील सर्वसामान्यांचे प्रश्न समजुन घेऊन, ते सोडवण्यासाठी वेळोवेळी आपणा जनता दरबाराचे आयोजन करावे, म्हणजे जनतेला आपल्या पालकमंत्र्याशी भेटताना कुणाच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही.


जनतेला पालकमंत्री हा आपल्या कुटूंबाचा एक सदस्य आहेत, याची खात्री वाटली पाहिजे. आपल्या कामाचा ठसा लातूरकरांना आणि विरोधकांनाही कायम लक्षात रहावा.व पालकमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात जनता दरबाराचे आयोजन करावे.या विविध मागणीचे निवेदन लातूर चे पालकमंत्री यांना आज दिनांक 2 में शुक्रवार रोजी पालकमंत्री विश्रामगृह औसा येथे आले असता महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी दिशा समितीच्या सदस्या व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे, शिवसेना शहरप्रमुख सुरेश दादा भुरे, खुंदमीर मुल्ला,अशोक कुंभार, पुरूषोत्तम नलगे, शेख सनाउल्ला दारु वाले, बाळू नरवाडे,किरण कदम, सुमित क्षीरसागर,आदि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या