*श्री नेताजी सावंत राज्यस्तरीय मानव सेवा पुरस्काराने सन्मानित*...
औसा प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील मौजे भुतमुगळीचे सुपुत्र तथा श्रीराम माध्यमिक विद्यालय एरंडी - सारोळा तालुका औसा जिल्हा लातूर या शाळेत माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असणारे श्री नेताजी माणिकराव सावंत सर यांनी 1997 पासून केलेल्या शैक्षणिक,सामाजिक, योगा - प्राणायाम क्षेत्रातील राज्यस्तरीय उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन"मानव जीवनगौरव व मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार 2025"हा अत्यंत मानाचा पुरस्कार श्री नेताजी सावंत यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रंजना सावंत व कन्या योगीतासह त्यांना 18 में 2025 रोजी दयानंद सभागृह लातूर येथे महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील,सद्गुरू ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर सहकार्याअध्यक्ष,विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती,पंढरपूर यांच्या शुभ हस्ते शाल,बुके,मौल्यवान गौरवग्रंथ,सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यातआले.यावेळी मंचावर लातूरचे लोकप्रिय खासदार डॉ.मा. श्री.शिवाजीराव काळगे,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.आ.श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर,जगप्रसिद्ध भागवताचार्य श्रध्देय रमांकांतजी व्यास, जगप्रसिद्ध गायक डॉ.अंबरीश महाराज देगलूरकर,सचिव वसंतराव घोगरे पाटील,अध्यक्षा सौ. सरोजा घोगरे पाटील व त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या.तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवड झालेले सत्कारमूर्ती, सपरिवारआणि त्यांचे मित्रमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. अत्यंत मानाचा मानला गेलेला हा पुरस्कार यापूर्वी 2019 मध्ये शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदार प्राचार्य डॉ.जनार्दनजी वाघमारे,2021मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री डॉ. तातेरावजी लहाने,2023 मध्ये सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांना प्रदान करण्यातआला होता. यावेळी सद्गुरु ह.भ. प.गहिनीनाथ महाराज यांनाही या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. श्री नेताजी सावंत यांना 2025 मधील हाअत्यंत मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातूनअभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या