शांताबाई उद्धवराव लोंढे यांचे निधन ..
औसा प्रतिनिधी
औसा येथील बौद्ध धर्माचे उपासक आणि आंबेडकर चळवळीचे गाढे अभ्यासक तथा आदर्श शिक्षक उद्धव नथू सिंग लोंढे यांच्या धर्मपत्नी शांताबाई उद्धव लोंढे यांचे शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 75 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार विवाहित मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी तीन वाजता औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या