कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा नोंद करा...
औसा प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूरला लीड करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा नोंद करण्यात यावा. या मागणीसाठी औसा येथे तहसीलदार मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे
भारत पाकीस्तान मधील आतंकवादाच्या विरोधात भारत सरकारद्वारा चालु असलेल्या सिंदूर ऑपरेशन ला लिड करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल काल मध्यप्रदेश सरकार मधील मंत्री असलेले विजय शहा यांनी इंदोर येथील एका सभेत बोलताना कर्नल कुरेशी बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये आतंकवादयाना मारण्यासाठी "हमने उनकी बहन भेजकर उनकी ऐसी की तैसी कर दी. असे बोलून पुर्ण देशाच्या विर सैनिकांचे आपमान करुन त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम केलेले आहे. असल्या मानसिकता असलेल्या व्यक्ती एखाद्या राज्याचे मंत्री पदावर संविधान नुसार राहुच शकत नाही. तसेच सदरील व्यक्तीनी देशाच्या सैनिकामध्ये कार्यरत असलेल्या सैनिकाला आतंकवादयाची बहिण असे संबोधीत करुन सैनिकाचा अपमान केलेला आहे व सैनिकाबद्दल संशय व्यक्त केलेला आहे. म्हणून अशा मंत्र्याला त्वरीत मंत्री मंडळातून हाकालपट्टी करुन त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा नोंद करावे. या मागणीसाठी औसेकरांच्या वतीने नसीर कुरेशी, खुंदमीर मुल्ला,मेहराज शेख,साजीद काझी, इलियास चौधरी,आदि आम्ही भारतीय या नात्याने औसा तहसीलदार मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन दिले आहे.
0 टिप्पण्या