पहलगाम घटनेच्या निषेधार्थ औशात आक्रोश मोर्चा

 पहलगाम घटनेच्या निषेधार्थ औशात आक्रोश मोर्चा 



औसा प्रतिनिधी 


औसा - जम्मू - काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून निष्पाप हिंदू बांधवांवर गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ औसा शहरात (दि.२७) रोजी सकल हिंदू   जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी पाकिस्तानी विरोधात घोषणाबाजी करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.


रविवारी सायंकाळी औसा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता .औसा येथील किल्ला मैदानावरून हजारो संख्येने हिंदू बांधव मोर्चात सहभागी झाले होते.हा मोर्चा गांधी चौक मार्गे जात हनुमान मंदिर येथे दाखल झाला. यावेळी हजारो हिंदू बांधवांनी एकमुखाने हनुमान चालीसा पठण करीत एकजुटी दाखविली याचबरोबर पाकिस्तानी ध्वज जाळून आपला रोष व्यक्त केला. पाकिस्तानी घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला होता. या आक्रोश मोर्चात किल्ला मैदानापासूनच आमदार अभिमन्यू पवार यांनी जन आक्रोश मोर्चात सहभागी होऊन पहलगाम घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या