दिशा समितीच्या महिला सदस्य पदी जयश्रीताई उटगे यांची नियुक्ती..

 दिशा समितीच्या महिला सदस्य पदी जयश्रीताई उटगे यांची नियुक्ती..


 औसा प्रतिनिधी

 शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका आणि औसा नगर परिषदेच्या माजी सदस्य जयश्रीताई उटगे यांची दिशा समितीच्या महिला सदस्य प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या शिफारशीवरून आणि लातूर मतदार संघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या मान्यतेने जयश्रीताई उटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने दिशा समितीचे कामकाज चालत असल्यामुळे आणि जयश्रीताई उटगे यांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेऊन दिशा समितीच्या सदस्य पदी कल्पना क्षीरसागर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातूर यांनी नियुक्ती करून पत्र दिले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महिला वर्गामध्ये घराघरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचविण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले होते. त्यांच्या नियुक्ती बद्दल माजी आमदार दिनकरराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, बजरंग दादा जाधव, माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे, शहर उपप्रमुख अशोक कुंभार यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या