समर्थ अर्बन को. ऑप. बँक लि. धाराशिवच्या अध्यक्षपदी ॲड. व्यंकट गुंड तर उपाध्यक्ष पदी ॲड. निवृत्ती कुदळे यांची निवड..
औसा प्रतिनिधी
समर्थ अर्बन को. ऑप. बँक लि. धाराशिव या बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. व्यंकट गुंड तर उपाध्यक्ष पदी ॲड. निवृत्ती कुदळे यांची निवड झाल्याबद्दल समर्थ अर्बन को. ऑप. बँक लि. धाराशिवच्या वतीने सत्कार करण्यात आला. ही निवड सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी डॉ. माधव अंबिलपुरे, डी.ये. जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तद्पूर्वी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली..
यावेळी बोलताना ॲड. व्यंकट गुंड यांनी रुपामाता उद्योग समूहाने शेतकरी व ठेवीदारांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे तसेच अल्प कालावधीमध्ये ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र राहून उत्तम कार्य चालत असल्यामुळे आपण समर्थ अर्बन को. ऑप. बँकेच्या भविष्यातील प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले. आईच्या निधनानंतर आपण चांगल्या कार्याच्या रुपाने आईची सतत आठवण राहावी म्हणून स्थापन केलेल्या सर्वच उपक्रमाला ठेवीदार सभासद व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.
0 टिप्पण्या