औसा तहसील कार्यालयात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा - महाराष्ट्र अपंग कल्याणकारी संघाचे तहसीलदाराना निवेदन ...

 औसा तहसील कार्यालयात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा -

महाराष्ट्र अपंग कल्याणकारी संघाचे तहसीलदाराना निवेदन ...




औसा प्रतिनिधी 


 औसा तालुक्यातील  गोरगरीब जनता कामानिमित्त  तहसील कार्यालय मध्ये दररोज येत असते.वाढता उन्हाचा पारा लक्षात घेता  औसा तहसील कार्यालयमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याची अत्यंत गरज आहे. तरी तहसीलदार साहेबांनी तहसील कार्यालयात पाण्याची व्यवस्था करावी.  यासाठी  महाराष्ट्र अपंग कल्याणकारी संघ औसा शहराच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.यावेळी महाराष्ट्र अपंग कल्याणकारी संघाचे औसा तालुका अध्यक्ष हरीभाऊ कुलकर्णी, औसा शहर अध्यक्ष अशोक देशमाने , सामाजिक कार्यकर्ते हरीचंद्र मांजरे,   उमेश बनसोडे, अजित पांडे आदि जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या