श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सप्ताह निमित्त भागवत कथा ज्ञान यज्ञ
औसा प्रतिनिधी
औसा येथील पवार नगर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिनांक 18 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि सुप्रसिद्ध कथा प्रवक्ते अंगद महाराज हिप्परगेकर यांचे श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सुरू आहे. संगीतमय कथा कार्यक्रमांमध्ये ह भ प पांडुरंग महाराज गुराळ, हार्मोनियम वादन श्री परमेश्वर महाराज आणि गायक व हार्मोनियम वादक म्हणून श्री दिलीप खेडे महाराज यांची साथ संगत होत आहे. रुक्मिणी माता महिला भजनी मंडळ, सरस्वती महिला भजनी मंडळ, श्रीहरी भजनी मंडळ यांच्या भजन गायनाचा सुमधुर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी ह भ प पांडुरंग दिगंबरराव गुराळे महाराज यांच्या उपस्थितीत सप्ताह आणि भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता होणार आहे तरी भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री दिलीप नरसिंगराव पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पवार नगर औसा यांच्या वतीने केले आहे.
0 टिप्पण्या