*जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्या हस्ते श्री नेताजी सावंत व धिरज बावणे सन्मानित*....
औसा प्रतिनिधी
राज्यस्तरीय सूर्यनमस्कार (योगासन) स्पर्धेत श्री नेताजी सावंत यांनी लातूर जिल्ह्याकरीता सुवर्णपदक मिळवून दिलेबद्दल अंतरराष्ट्रीय धावपटू तथा क्रीडा उपसंचालक लातूर विभाग लातूर व जिल्हा क्रीडाअधिकारी मा.श्री.जगन्नाथजी लकडे साहेब यांच्या शुभ हस्ते श्री. नेताजी सावंत यांचा शाल, श्रीफल व बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्तव्यदक्ष क्रीडाअधिकारी मा.श्री.धीरजजी बावणे यांनी राज्यस्तरावरील सूर्यनमस्कार स्पर्धेकरीता योग्य त्या शिक्षकांची निवड केलेबद्दल तसेच इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे क्रीडा स्पर्धेचे विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळवून देण्याच्या कामी अतिशय परिश्रमपूर्वक संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेबद्दल तसेच एक कर्तव्यदक्ष क्रीडा अधिकारी म्हणून आपली सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडीत असलेबद्दल उपसंचालक तथा जिल्हा क्रीडाअधिकारी मा.श्री. जगन्नाथजी लकडे साहेब यांनी धिरजजी बावणे साहेब यांनाही,शाल,श्रीफळ व बुके देऊन सन्मानित केले. तसेच हनुमान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मा.श्री. संदिपानजी माळी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडाअधिकारी मा. श्री.जगन्नाथजी लकडे साहेब यांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालयातील या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या वेळी उपसंचालक तथा जिल्हा क्रीडाअधिकारी मा.श्री. जगन्नाथजी लकडे साहेब,अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा तालुका क्रीडाधिकारी श्रीमती सारिका काळे मॅडम,तालुका क्रीडाअधिकारी मा.श्री.सुरेंद्रजी कराड साहेब,राज्य क्रीडा मार्गदर्शक मा.श्री.जयराजजी मुंडे साहेब,राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांतजी लोदगेकर साहेब, क्रीडा अधिकारी मा.श्री.कैलासजी लटके साहेब ,क्रीडा अधिकारी कृष्णाजी केंद्रे साहेब,माजी मुख्याध्यापक संदिपानजी माळी,सत्कारमूर्ती क्रीडा अधिकारी मा.श्री.धिरजजी बावणे व सत्कारमूर्ती राज्यस्तरीय गोल्ड मेडलिस्ट मा.श्री.नेताजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या